मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सांगली जिल्ह्यात ग्रामसभेंना ऐतिहासिक दोन लाख नऊ हजार ग्रामस्थांची उपस्थित

ग्रामपंचायत मांगले तालुका- शिराळा जिल्हा – सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली तथा प्रशासक श्री विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से) यांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा अत्यंत उत्साहात पार पडली.
तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोलताना समृद्ध व विकसित गावच्या विकासासाठी मांगले ग्रामपंचायत शासकीय पातळीवरील विविध योजणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे.यापुढील काळात देखील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावविकासासाठी लोकसहभागातून एक चळवळ म्हणून काम करुन महाराष्ट्रात प्रथम क्रंमाक मिळवावा असे आवाहन जिल्हा परीषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांनी केले.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, विराज इंडस्ट्रीज चे अध्यक्ष विराज नाईक,प्रांताधिकारी अधिकारी श्रीनिवास अर्जुन, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तहसीलदार शामल खोत उपसरपंच तानाजी जमदाडे प्रमुख उपस्थित होते.स्वागत प्रास्ताविक सरपंच प्रल्हाद पाटील यांनी केले. श्री विशाल नरवाडे म्हणाले समृद्ध गावासाठी लोकसहभाग, श्रमदानाच्या , माध्यमातून लोकचळवळ निर्माण केली पाहिजे ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, सक्षमीकरण केले पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना राज्यस्तरीय घरकुल योजना महिलांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी मांगले ग्रामपंचायत उठावदार काम करत आहे. ग्रामस्थाचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्यायासाठी सर्वच पातळीवर प्रभावीपणे काम करावे व राज्य पातळीवरील प्रथम क्रंमाक मिळवावा व गावचा सर्वागीण विकास साधावा असे आवाहन केले.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले वारणा व मोरणा नदीच्या संगमावरील मांगले हे गाव समुध्द व जागृत गाव आहे. शासकीय योजनेना लोकसहभागातून लोकचळवळ म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थ, युवक, महिला, भगिनी यांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम करावे. मांगले गावाला जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळावे. शासकीय अधिकाऱ्यांनी अधिकारपदाचा उपयोग समाजातील तळागाळातील जनतेच्या हितासाठी करावा.
यावेळी माजी राजमंत्री शिवाजीराव नाईक, विराज उद्योग समुहाचे अध्यक्ष विराज नाईक, तहसिलदार शामल खोत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी संजय पाटील, महसुल, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.