मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाकडील कर्मचारी अधिकारी यांना गावनिहाय उद्दिष्ट निश्चिती करणे संदर्भात मार्गदर्शन

आज जिल्हा परिषद सांगली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाकडील कर्मचारी अधिकारी यांना गावनिहाय उद्दिष्ट निश्चिती करणे संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये पंचायत समिती स्तरावरील विभागांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने गाव निहाय पूर्ण केलेले उद्दिष्ट व अभियान कालावधीत पूर्ण करावयाची उद्दिष्ट याची माहिती संकलित करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचबरोबर गाव स्तरावरील अभियान कालावधीत घ्यावयाची श्रमदान उपक्रम, नावीन्यपूर्ण उपक्रम,कर वसुली मोहीम व घरकुल पूर्ण करून घेणे या विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीस मा. शशिकांत शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. यांनी मार्गदर्शन केले.