मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ढोलेवाडी ता. शिराळा जी. सांगली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ढोलेवाडी ता. शिराळा जी. सांगली ग्रामपंचायत ने दिनांक 21 /09/2025 रोजी लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली या मोहिमेमध्ये मा. प्रकाश पोळ साहेब गटविकास पंचायत समिती शिराळा यांच्या शुभहस्ते जि प शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण शुभारंभ करण्यात आला या अभियान साठी ग्रामपंचायत पदाधिकारी मा.सरपंच रणजीत सर्जेराव मोरे उपसरपंच वनिता पांडुरंग ढोले ग्रामपंचायत सदस्य राजेश बाजीराव पाटील, आप्पासो सोपान मोरे, शारदा बाजीराव मोरे, बाबासो भगवान मोरे, ग्रामपंचायत अधिकारी राजेश सूर्यवंशी कर्मचारी संजय मोरे अमित पवार मोठ्या संख्येने आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ महिला सदस्य यांच्या उपस्थिती. हे अभियान यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामस्थांना आव्हान व प्रबोधन केले.