आदिशक्ती अभियान व पुरस्कार – अंमलबजावणी आराखडा
महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, सांगली
1. प्रस्तावना :-
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” राबविण्यात येत आहे.या विशेष अभियाना अंतर्गत शासनाकडून राबविण्यात येणा-या सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहोचविणे, राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य् विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे, जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करुन कायमस्वरुपी उपाययोजना करणे तसेच आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणा-या ग्रामपंचातीला “आदिशक्ती पुरस्कार” प्रदान करणे.
2. उद्दिष्टे :
– महिलांचे हक्क, शासन योजना, स्वयंरोजगार, आरोग्य, शिक्षण याबाबत जनजागृती करणे व त्यांच्या समस्यांचे
निवारण करणे.
-कुपोषण,बालमृत्यू,मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता सक्षमा समाज निर्माण करणे.
-लिंगभेदात्म्क विचारसरणीला आव्हान देणे,लैंगिक,शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करणे,मुलींमध्ये शिक्षणाचे
प्रमाण वाढविणे,बालविवाह मुक्त् समाज निर्माण करणे.
– महिला कौशल्य प्रशिक्षण व उद्योजकता विकास – प्रशिक्षण कार्यशाळा, स्वयंसहायता गट प्रोत्साहन.
-महिलांना शाश्वत व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे
– महिलांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा व हक्क यांच्याबाबत जनजागृती
– ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या कौशल्यांना चालना देणे
– आदर्श महिलांची निवड आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ वितरण –तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श
महिलांची निवड करून सन्मान.
3. आदिशक्ती अभियान राबविण्याची कार्यपद्धती :-
अ. कालावधी व क्षेत्रनिवड :
– अभियानाची कालावधी: 22 मे 2025 ते 31 डिसेंबर 2025
– संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका व ग्राम/शहरी पातळीवर विशेष समित्यांचे गठण करुन अंमलबजावणी
– पुरस्कार वितरण कार्यक्रम: मार्च 2026 (स्थळ व तारीख नंतर निश्चित होईल)
4. स्तरवार समित्यांची स्थापना
- ग्रामस्तर–ग्रामसभेने निवडलेली महिला प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली (आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका,महिला पोलीस पाटील)
- तालुकास्तर – गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
- जिल्हास्तर – मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
- विभागस्त्र – मा.आयुक्त्,महिला व बाल विकास,पुणे यांच्या अध्यक्षतेखोली
- राज्यस्तर – मा.मंत्री,महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली.
5. कार्यक्रम अंमलबजावणी
- शासकीय योजनांचा प्रचार, जनजागृती, बालविवाह, कुपोषण व इतर सामाजिक विषयांवरील उपक्रम
- महिला बचतगट, कौशल्य विकास, मालमत्ता नोंदणी, आरोग्य, पोषण आणि पर्यावरणीय उपक्रम
6. प्रशासनिक स्तरांवरील जबाबदाऱ्या
ग्राम पातळीवर
- ग्रामसभा / महिला सभा आयोजन करून अभियानाचा प्रारंभ.
- अंगणवाडी कार्यकर्तीमार्फत महिलांना योजनांची माहिती देणे.
- ग्रामपंचायत व स्थानिक स्वयंसेवी संस्था समन्वय.
मुख्य सहभागी: ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचतगट, स्थानिक महिला
उद्योजिका
तालुका पातळीवर
- सर्व संबंधित ग्रामपंचायतींना मार्गदर्शन व निरीक्षण.
- प्रशिक्षण कार्यक्रम व जनजागृती मोहीम राबविणे.
- प्राथमिक स्तरावर आदर्श महिलांची निवड व सूची तयार करणे.
- कार्यक्रमाचे आयोजन (रॅली, कार्यशाळा, स्टॉल्स इ.)
मुख्य सहभागी: बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, महिला व किशोरी गट
जिल्हा पातळीवर
- संपूर्ण अभियानाचे समन्वय व निगराणी.
- जिल्हास्तरीय समिती स्थापनेद्वारे पुरस्कारासाठी अंतिम निवड.
- प्रांत स्तरावर कार्यशाळा, परिसंवाद व मीडिया संवाद.
- अंतिम “आदिशक्ती पुरस्कार” वितरण कार्यक्रमाचे आयोजन.
मुख्य सहभागी: जिल्हाधिकारी / महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बालकल्याण समिती
अ. प्रमुख उपक्रम :
- महिला जनजागृती शिबिरे,चौक सभा,जागर फेरी,प्रभात फेरी,पथनाटय,विविध स्पर्धा आयोजन
- आरोग्य तपासणी व पोषण आहार मोहीम
- स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा
- कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे
- आदिशक्ती रॅली व कला-प्रदर्शन
ब. सहभागी यंत्रणा :
– महिला व बालविकास विभाग
– पंचायत राज संस्था
– आरोग्य विभाग
– पोलीस विभाग
– शिक्षण विभाग
– स्वयंसेवी संस्था
7. मूल्यांकन निकष
- बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, कौटुंबिक हिंसा प्रतिबंध
- महिला बचतगट, कौशल्य प्रशिक्षण, मालमत्तेवरील हक्क
- संस्थात्मक प्रसूती, स्कूली शिक्षणातील योगदान
- आरोग्य तपासणी, पोषण, पर्यावरण व सामाजिक सुरक्षा उपक्रम
8. निवड प्रक्रिया –
- तालुक्यामध्ये आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणा-या तीन ग्रामस्तरीय समित्यांची / ग्रामपंचायतींची निवड तालुकास्तरीय समिती करेल व पुरस्कार जाहीर करेल.
- प्रत्येक तालुक्यातून प्रथम,व्दितीय व तृतिय पुरस्कार मिळालेल्या ग्रामस्तरीय समित्यांचे / ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समिती एकत्र करेल गुणवत्तेनुसार प्रथम,व्दितीय व तृतीय पुरस्कार पुरस्कार जाहीर करेल.
- जिल्हा स्तरीय समिती मार्फत जिल्हयातील प्रथम,व्दितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त् ग्रामस्तरीय समित्यांचे / ग्रामपंचायतींचे प्रस्ताव विभागस्तरीय समितीकडे सादर करणेत येतील.
9. पुरस्कारांची रक्कम (22 मे 2025 निर्णयानुसार)
- तालुकास्तर :- क्रमांक १: ₹1,00,000 क्रमांक २: ₹50,000 क्रमांक ३: ₹25,000
- जिल्हास्तर :- क्रमांक १: ₹5,00,000 क्रमांक २: ₹3,00,000 क्रमांक ३: ₹1,00,000
- राज्यस्तर :- क्रमांक १: ₹10,00,000 क्रमांक २: ₹7,00,000 क्रमांक ३: ₹5,00,000
10. पुरस्कार वितरण कालावधी
- मूल्यमापन – 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
- वितरण – मार्चच्या पहिल्या आठवड्यात
11. सुधारित शासन निर्णय (1 जुलै 2025)
• राज्यस्तरीय समितीकडे धोरणात्मक बदल करण्याचे अधिकार
- अंमलबजावणी प्रक्रियेत सूक्ष्म सुधारणा
परिशिष्टानुसार गुणदान
अ.नं. |
कामाचे विवरण |
निर्देशांक |
गुण देणेचे निकष |
एकूण गुण |
1 |
बालविवाह प्रतिबंधक विषयक उपाययोजना करणे |
गांव बालविवाह मुक्त् करणे |
बालविवाह
झाला असल्यास – 0 गुण
झाला नसल्यास-10 गुण |
10 |
2 |
सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करणे |
सहभागी होणा-या जोडप्यांच्या संख्येमध्ये वाढ करणे |
सहभागी जोडप्यांची संख्या
0= 0 गुण
0 ते 5 = 3 गुण
6 ते 10=5 गुण
10 पेक्षा जास्त् = 10 गुण |
10 |
3 |
हुंडा प्रथेस प्रतिबंध करणे |
ग्रा.पं.कार्यक्षेत्रामध्ये हुंडा न घेण्याची प्रथा रुढ करणे |
हुंडाबळी प्रकरण
नोंद असल्यास -0 गुण
नोंद नसल्यास -10 गुण |
10 |
4 |
गांव कौटुंबिक हिंसाचारमुक्त् करणे
|
गांव कौटुंबिक हिंसाचारमुक्त् करणेच्या प्रक्रियेस बळकटी देणे |
कौटुंबिक हिंसाचार
नोंद असल्यास -0 गुण
नोंद नसल्यास -10 गुण |
10 |
5 |
10/ 12 वी उत्तीर्ण मुलींना कौशल्य् विकासाचे प्रशिक्षण देणे |
कौशल्य् विकासाच्या संधी उपलब्ध् करुन देणे |
गामपंचायतींच्या वर्गीकरणानुसार
प्रशिक्षणामध्ये भाग घेतलेल्या मुलींच्या संख्येच्या प्रमाणात
ग्राप प्रकार |
0गुण |
5गुण |
10गुण |
अ |
X=0 |
X=1 |
X=2 |
ब |
X=0 |
X=2 |
X=4 |
क |
X=0 |
X=4 |
X=8 |
ड |
X=0 |
X=6 |
X=12 |
|
10 |
6 |
खाजगी/शासकिय नोकरी मध्ये कार्यरत तसेच स्वयंरोजगारामध्ये कार्यरत महिलांच्या संख्येचे प्रमाण जास्त् असणारे गांव |
स्वयंरोजगारामध्ये कार्यरत महिलांच्या संख्येचे प्रमाण वाढविणे
|
मागील वर्षी (A)–चालू वर्षी (B)
X=(B-A)
ग्राप प्रकार |
0गुण |
5गुण |
10गुण |
अ |
X=0 |
X upto5 |
X morethan 5 |
ब |
X=0 |
Xupto10 |
X morethan 10 |
क |
X=0 |
Xupto15 |
X morethan 15 |
ड |
X=0 |
Xupto20 |
X morethan 20 |
|
10 |
7 |
नविन बचतगट निर्मिती व सक्षमीकरण |
ग्रा.पं.कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त् महिलांना महिला बचत गटाचे सदस्य्त्व् मिळवून देणे व गट सक्षमीकरणे करणे |
मागील वर्षी समाविष्ट महिला संख्या (A)–चालू वर्षी समाविष्ट महिला संख्या (B)
X=(B-A)
X=0 = 0 गुण
X=0 ते 5 = 3 गुण
X=6 ते 10 = 5 गुण
X=10 पेक्षा जास्त् = 10 गुण |
10 |
8 |
गावामध्ये महिलांच्या नांव घर व शेत जमीनीचे फेरफार केल्याची संख्या |
ग्रा.पं.कार्यक्षेत्रात महिलांच्या नांवे घर / शेत जमीनीचे फेरफार करण्याची संख्या वाढविणे |
मागील वर्षी महिलांच्या नांवे घर/शेत केलेल्या (A) – चालू वर्षी महिलांच्या नांवे घर/शेत केलेल्या प्रकरणांची संख्या (B)
X=(B-A)
X=0 = 0 गुण
X=0 ते 5 = 3 गुण
X=6 ते 10 = 5 गुण
X=10 पेक्षा जास्त् = 10 गुण |
10 |
9 |
आरोग्य् तपासणी / हिमोग्लोबिन चाचणी करणे(सहा महिन्यातून एक वेळ) |
आरोग्य् तपासणी / हिमोग्लोबिन चाचणी करण्याचे शिबिराचे (सहा महिन्यातून एक वेळ आयेाजन करणे) |
शिबिराचे आयोजन
केल्यास -10 गुण
न केल्यास -0 गुण |
10 |
10 |
संस्थात्म्क प्रसुती वाढविणे |
100 टक्के संस्थात्म्क प्रसुती |
संस्थात्म्क प्रसुती
100 टक्के झाली असल्यास -10 गुण
100 टक्के झाली नसल्यास -0 गुण |
10 |
11 |
गरोदर मातांची किमान चार ए.एन.सी.तपासणी करणे |
चार ए.एन.सी.तपासणी केलेल्या गरोदर मातांची एकूण संख्या |
100 टक्के गरोदर मातांची किमान चार ए.एन.सी.
झाली असल्यास – 10 गुण
झाली नसल्यास –0 गुण |
10 |
12 |
गावामधील शाळाबाहय मुलींच्या संख्येवर नियंत्रण आणणे |
ग्रा.पं.कार्यक्षेत्रातील सर्व मुली 10 पर्यंत नियमित शाळेत जातील या बाबीवर लक्ष देणे |
गावात शाळाबाहय मुली
असल्यास –0 गुण
नसल्यास –10 गुण |
10 |
13 |
महिला स्नेही वातावरण निर्मिती करणे |
महिला स्नेही वातावरण निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन ग्रा.पं.स्तरावर करणे |
प्रशिक्षण झालेस -10 गुण
प्रशिक्षण झाले नसल्यास -0 गुण |
10 |