ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
विभागाविषयी माहिती
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आयएसआय मानांकनानुसार पिण्याच्या पाण्याची सोय करणे हे महत्वपूर्ण कामकाज विभागामार्फत करणेत येत आहे. सन 2009-10 पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून, पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नलसे जल” (कार्यात्मक घरगुती टॅप कनेक्शन) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लि. प्रतिदिन, गुणवत्ता पुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्यीष्ट आहे.
परिचय
सांगली जिल्हयात कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, सांगली यांचे अधिपत्याखाली प्रत्येक तालुक्यात 1 याप्रमाणे एकूण 10 उपविभाग कार्यरत आहेत. तसेच मुख्यालयाचे ठिकाणी यांत्रिकी उपविभाग व देखभाल दुरुस्ती कक्ष असे दोन उपविभाग कार्यरत आहेत.
दृष्टीकोन व उद्दिष्टे
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आयएसआय मानांकनानुसार पिण्याच्या पाण्याची सोय करणे हे महत्वाचे उद्दिष्ट या विभागामार्फत साध्य केले जाते.
उद्दिष्टे आणि कार्ये
जल जीवन मिशन अंतर्गत सांगली जिल्ह्यातील एकूण 683 योजना डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करणेचे उद्दिष्ट ठेवणेत आलेले आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 459048 इतकी कुटुंब संख्या असून त्यापैकी आज अखेर 401570 इतक्या कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करणेत आला आहे. उर्वरित 57428 कुटुंबाना डिसेंबर 2025 अखेर 100% नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करणेचे उद्दिष्ट ठेवणेत आलेले आहे.