नाविन्यपूर्ण उपक्रम
"प्रशासनाय " : प्रशासनासाठी AI वेब-पुस्तिका

ई-ऑफिस
उद्देश:
-कामकाजात गतिमानता,पारदर्शकता व लोकाभिमुख प्रशासन.
-टपाल व नस्तीचे प्रभावी व्यवस्थापन व सनियंत्रण.
-झिरो पेंडन्सी (शून्य प्रलंबितता).
-प्रकरण व मेज निहाय प्रलंबिततेवर नियंत्रण.
दृष्टीक्षेप:
-दिनांक २३ मे २०२४ पासून जिल्हा परिषद सांगली येथे ई- ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी.
-जिल्हा स्तरावर १२ मास्टर ट्रेनर्स नियुक्त व २०+ प्रशिक्षण सत्रे.
-सर्व पंचायत समित्यांचा ई- ऑफिस प्रणालीमध्ये समावेश करून कामकाज करणारी पहिली -जिल्हा परिषद
-राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ई- ऑफिस प्रणालीमध्ये अग्रेसर.
-
जिल्हा परिषद स्तर- दि. २२ मे २०२४ व ३१ जुलै २०२४ रोजी प्रशिक्षणे आयोजित करून जिल्हा परिषदांस्तरावरील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे.
-
पंचायत समिती स्तर- माहे ऑगस्ट व सप्टेबर २०२४ व ९ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रशिक्षणे आयोजित करून पंचायत समिती स्तरस्तरावरील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे.

"माझी वसुंधरा अभियान"

-
जिल्हा परिषद सांगलीने माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे
-
जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता त्यातील ३३९ ग्रामपंचायतींचे फिल्ड असेसमेंटसाठी निवड झाली.
-
जिल्हा परिषद सांगलीने दुसऱ्या वेळी माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
-
जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीनी ९.९५ कोटी रकमेची १८ बक्षिसे प्राप्त केली आहेत.
-
जिल्ह्यातील येडेनिपाणी व नांगोळे या दोन ग्रामपंचायतीनी वेगवेगळ्या लोकसंख्या गटात भूमी या थीम मध्ये विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे.
-
जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला आहे.
-
प्रत्येक गावात भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाचही थीम मध्ये निर्देशकनिहाय काम सुरु आहे.
-
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी पर्यावरणपूरक गणेशउत्सव साजरा केला आहे.
-
वायू तपासणी, ई वेहिकल चार्जिंग स्टेशन उभारणी, सोलर ऑनग्रीड सिस्टीम उभारणी मध्ये अनेक ग्रामपंचायती आघाडीवर आहेत.
-
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्व पंचायत समिती मध्ये तालुका अभियान कक्ष स्थापन करण्यात आला.
-
माझी वसुंधरा अभियान ५.० चे ऑनलाईन उपक्रम निरीक्षण प्रणाली निर्माण केली.
-
जि.प. कडील सर्व विभागप्रमुखांना माझी वसुंधरा उपक्रम अंमलबजावणीची जबाबदारी दिली आहे.
-
जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये अभियान प्रचार व प्रसिद्धी फलक बसविणेचे नियोजित आहे
"ग्रामगीता" प्रणाली

-
ही प्रणाली प्रत्येक मालमत्तेचा भौगोलिक डेटा (स्थान) नकाशावर दर्शवते, त्यासंबंधित माहिती (जसे की फोटो, वापर, स्थिती, विभागीय ताबा इत्यादी) डेटाबेसमध्ये नोंदवते आणि एक केंद्रीभूत, पारदर्शक व अपडेट होणारी मालमत्ता नोंद प्रणाली तयार करते सर्व मालमत्तांची अचूक भौगोलिक ठिकाणांची माहिती उपलब्ध होते. Google map किंवा GIS नकाशांवर या मालमत्ता दर्शवता येतात.
-
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व मालमत्तांची माहिती एकाच ठिकाणी संग्रहित केली जाते. कोणती मालमत्ता वापरात आहे व कोणती निष्क्रिय आहे, हे सहज समजते.
-
प्रत्येक मालमत्तेच्या दुरुस्तीचा वेळ, मालमत्तेच्या स्थितीचा फोटो, तारीख, खर्च यांचे नोंदी व मोबाईल अॅपद्वारे अपडेट करता येतात.
-
आपत्तीच्या वेळी जिथे लोकांना स्थलांतर करावे लागते त्यावेळी सार्वजनिक मालमत्तांचा वापर करता येतो.
-
Geo-Tag आधारित ऍपमुळे लवकरात लवकर मालमत्तांची यादी मिळते (शाळा, सभागृह).
-
जर हे ऍप नागरिकांसाठी खुलं केल तर त्यांनाही मालमत्ता वापराबाबत माहिती मिळू शकते. नागरिक एखादी मालमत्ता निष्क्रिय आहे, खराब स्थितीत आहे हे नोंदवू शकतात. त्यामुळे प्रशासन व नागरिक यांच्यात संवाद वाढतो.
-
भविष्यात मालमत्तेबाबत वाद निर्माण झाल्यास, हे डेटाबेस पुरावा म्हणून उपयोगी ठरते. प्रत्येक मालमत्तेचा फोटो, GPS लोकेशन, ताबा, सारखी माहिती अधिकृत दस्तऐवजाप्रमाणे वापरता येते.
-
मालमत्ता संबंधीचे विविध प्रकारचे रिपोर्ट तालुका, विभाग, गाव निहाय सहज तयार करता येतात. उदा. “एका तालुक्यात किती शाळा आहेत?”, “किती अंगणवाड्या दुरुस्त करायच्या आहेत?” इत्यादी माहिती तात्काळ उपलब्ध होते.
-
शासनाच्या विविध योजनांमध्ये मालमत्तांचा उपयोग करता येतो.
सौर अंगणवाडी
-
काळानुरूप डिजिटल शिक्षण पध्दतीसाठी अंगणवाडयांचे विदयुतीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी सांगली जिल्हातील ग्रामीण भागातील 499 अंगणवाडी केंद्राना 1 किलो वॅट ऑन ग्रीड सोलार सिस्टीम (सौर ऊर्जा यंत्रणा) बसविणेत आलेली आहे. त्यामुळे अंगणवाडयांना मोफत वीज मिळत आहे.
-
दरमहा येणा-या विज बिलाची रक्कम भरण्यात येणा-या समस्यापासून कायमस्वरूपी मुक्ती.
-
बिल भरणा केला नसल्यामुळे MSEB मार्फत वारंवार लाईट कनेक्शन कट करण्यापासून कायमस्वरूपी मुक्ती.
-
जल जीवन मिशन अंतर्गंत पिण्याच्या पाण्यासाठी प्राप्त मोटार साठी उपयुक्त.
-
सौर ऊर्जा स्वच्छ प्रदुषण विरहित, पर्यावरण पूरक अशा नैयर्गिक ऊर्जेचा अक्षय स्त्रोत

बाल संसाधन व विकास केंद्र (CRDC)
-
बालसंसाधन व विकास केंद्र या मध्यवर्ती केंद्रामार्फत जिल्हातील सर्व तालुके सर्व अंगणवाडी बीट ऑनलाईन पध्दतीने जोडणेत आली आहेत. अशाचप्रकारे सर्व अंगणवाडया ऑनलाईन पध्दतीने जोडणेत येणार आहेत.
-
बाल संसाधन व विकास केंद्रामार्फत जिल्हास्तरावरून भविष्यात दावयाच्या सूचना , योजनांच्या लाभांची माहिती तसेच अंगणवाडी, बीट व तालुकास्तरावरून घ्यावया0ची माहिती यामध्ये अत्यंत कमी कालावधीत कामकाज करणेसाठी वापर होणार आहे.
-
बाल संसाधन व विकास केंद्रामार्फत जिल्हास्तरावरून सर्व सेविका , बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत एकाच वेळी सूचना देणे व अहवाल प्राप्त करून घेणे सदर केंद्रामार्फत सुलभ होणार आहे. तसेच प्रत्येक स्तरावरील कामकाजावर एका ठिकाणावरून संनियंत्रण करणेमध्ये सुलभता येणार आहे.

3D अंगणवाडी
-
प्रत्येक बीट मधील एका अंगणवाडी केंद्रामध्ये आकार अभ्यासक्रम आधारित अंकुर प्रकल्पातर्गंत थ्रिडी अंगणवाडी तथा बाल संसाधन व विकास केंद्र तयार करण्यात आले.
-
बालविकास संदर्भात नवनवीन उपक्रम बाबतचे प्रशिक्षण अंगणवाडी सेविका यांना Hands on training या पध्दतीने देणे शक्य होणार आहे.
-
आरोग्य विभाग व ICDS विभाग यांचे स्थानिक पातळीवर समन्वय केंद्र म्हणून कार्य होऊ शकते.
-
नियमित गृहभेटी मध्ये पालकत्व तसेच बालकांच्या वाढ विषयी कार्यक्रमाचे नियोजन होणार आहे.
-
विशिष्ट गरज असणा-या , दिव्यांग, मानसिक आरोग्य विषयक अडचण असणारी तसेच उशीरा विकास होणारे मुले यांची वेहीच शोध व संदर्भ सेवा शंक्य होणार आहे.
-
बालक पालक संवाद यासारखे काहानुरूप कार्यक्रम हाती घेऊन बालकांना पोषण कौटुकिब वातावरण तसेच बालकांचे हक्क व पालकांचे कर्तव्य या विषयी मार्गदर्शन होणार आहे.

महिला दिन
-
महिला व बालकलयाण विभाग, जिल्हा परिषद, सांगली मार्फत 8 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद आवारात सर्व महिला अधिकाऱ्यांचे उपस्थितीत जिल्हा परिषदमधील सर्व महिला कर्मचारी ग्रामीण भागातील ग्रामस्थ तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका मदतनीस या सर्व महिलांना पारंपारिक नऊवारी साडीमध्ये उपस्थितीत राहुन जिजाऊ वंदना, गणेश वंदना, याचा आनंद घेतला.
-
विठठल विठठल या गाण्यावर सर्व उपस्थित महिलांनी टाळ मृदंगाच्या गजरात नृत्य करत भक्ती रसाचा आनंद घेतला .
-
महिलाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक प्रगतीबाबत जनजागृती करणेसाठी मेळावा घेण्यात आला.
-
महिलांसाठी योगासने, जिजाऊ वंदना, उखाणे , फुगडी, झुंबा डान्स, नृत्य, गाणी इत्यादीचे कार्यक्रम घेणेत आले.
-
सदरच्या महिला दिन हा उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला. महिलामध्ये नवचैतन्य आत्मविश्वास व एकात्मता यांचे वातावरण निर्माण झाले.

महिला कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघर व हिरकणी कक्ष
-
जिल्हा परिषदेमध्ये काम करणा-या महिला कर्मचारी तसेच कामानिमित्त जिल्हा परिषदेस भेट देणा-या महिला कर्मचारी व इतर महिला अभ्यंगत यांना त्यांची लहान मुले सुरक्षित अशा ठिकाणी ठेवण्याची जागा नसते अशा महिला कर्मचारी व अभ्यंगत महिला यांच्या लहान बालकांसाठी जिल्हा परिषद, सांगली येथे पाळणघर सुरू करण्यात आले आहे.
-
तसेच गरोदर माता, यांना विश्रांतीसाठी व स्तनदा माता यांना सुरक्षित ठिकाणी बालकाला स्तनपान करता यावे यासाठी अदयावत हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
-
सदरच्या पाळणाघरामध्ये मुलांना खाण्यासाठी खावू गरम करणकरिता स्वतंत्र्य किचनची सोय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय फ्रीज तसेच मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी , पाळणा, बेड, मनोरंजनासाठी टीव्ही या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
-
पाळणाघरामध्ये लहान बालके खेळताना ती पडल्यास त्यांना इजा होऊ नये याकरिता संपूर्ण जमीनीवर फोरमचे मॅट अंथरणेत आले आहे.
-
हिरकणी कक्षामध्ये मातांसाठी खुर्ची, बेड, स्वतंत्र्य शौचालयाची सोय करण्यात आलेली आहे.


माझ्या गावचा धडा
-
सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून साकारला जात असलेला हा उपक्रम !
-
शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि विस्तार अधिकार्री डॉ. विमल माने यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
-
या उपक्रमामध्ये शिक्षकांनी मराठी, हिंदी इंग्रजी , गणित विज्ञान, परिसर अभ्यास कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांमध्ये परिसराच्या अनुषंगाने विविध धडे लिहिले आहेत.
-
आपल्याच गावाशी संबंधित धडे असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते आपलेसे वाटतात.
-
परिसरातील नद्या, ओढे, मंदिरे, शेती, पशु पालन, गुऱ्हाळ घरे, बाजार, उद्योग, सण-समारंभ, उत्सव, रूढी परंपरा या सर्वांचा परिचय विद्यार्थ्यांला नव्याने होत असून परिसराशी त्याची नाळ अधिक घट्ट होत आहे.
-
आपल्याच परिसरातील धडे असल्याने विद्यार्थी अतिशय आवडीने त्याचा अभ्यास करतात.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी या धड्यांचा निश्चित उपयोग होत आहे.
-
या उपक्रमात सांगली जिल्ह्यातील ६९६ गावातील शिक्षकांनी विविध विषयांमध्ये २२६३ धडे लिहिले आहेत.
-
या धड्यामधून गावांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा धड्यांच्या रूपाने लिहला गेला आहे.
-
इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना सदर धड्यामध्ये अध्ययन निष्पत्तीनुसार स्वाध्याय व उपक्रमदेखील दिले आहेत.

ऑनलाईन चाचणी परीक्षा

चला सावली पेरूया


तंबाखूमुक्त शाळा
-
60 x 45 सेंटीमीटर चा तंबाखूमुक्त परिसर असा फलक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ लावणे.
-
60 x 45 सेंटीमीटर चा तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था फलक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ लावणे.
-
शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाच्या वापराचा पुरावा असू नये. उदा.सिगरेट बिडी चे तुकडे/गुटखा/तंबाखूचे भिंतीवर थुंकल्याचे डाग
-
तंबाखूच्या दुष्परिणाम वर आधारित पोस्टर्स/साहित्य शाळेत प्रदर्शित केलेले असावे.
-
सहा महिन्यात किमान एक तंबाखू नियंत्रणावर आधारित शाळेत उपक्रम राबवणे. उदाहरणार्थ प्रभात फेरी,चित्रकला, निबंध स्पर्धा तंबाखूचे दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन इत्यादी.
-
शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती ,तंबाखू मॉनिटर म्हणून नामीत केले पाहिजे.साईन बोर्डवर तंबाखू मॉनिटर चे नावे , पदनाम आणि संपर्क क्रमांक नमूद केले जावेत.
-
तंबाखूचा वापर शाळेच्या परिसरात केला जाणार नाही, हा नियम शैक्षणिक संस्थेच्या आचारसंहितेमध्ये समाविष्ट केला गेला पाहिजे.
-
शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून 100 यार्ड क्षेत्र रेखांकित केले गेले पाहिजे.
-
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्डात नसावे.

ऑनलाईन चाचणी परीक्षा

संगणक शिक्षण अभ्यासक्रम

माझा कर्मचारी स्वस्थ कर्मचारी
-
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी, पत्रकाराची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, ई.सी.जी तपासणी शिबीर संपन्न झाले.
-
त्यामध्ये 1) C.B.C. 2) K.FT. 3) LFT 4) Thyroid/T.F.T. 5) Lipid Profile 6) HbA1C 7) BSL Fasting या प्रकारच्या रक्त तपासण्या महालेंब (HLL) यांच्या मार्फत करण्यात आल्या.
-
दुसऱ्या टप्यात पंचायत समिती कडील अधिकारी/ कर्मचारी यांच्या वरील प्रमाणे तपासण्या करण्यात आल्या.
-
याची प्रेरणा घेऊन जिल्हास्तरावरील व तालुक्यातील इतर विभागाच्या शासकीय कार्यालयांनी देखील सदरच्या तपासण्या करून घेतल्या आहेत.
-
“ माझा कर्मचारी – स्वस्थ कर्मचारी ” या अंतर्गत जागतिक माहिला दिनी “चला बोलूया……..” या सदराखाली विशेष शिबीर महिला कर्मचारी यांचेसाठी घेण्यात आले.
-
स्वयंशिस्त, स्वयंप्रेरणा, साहस, एकोपा वाढवा यासाठी “ Zumba with नऊवारी ” याद्वारे योगा, व्यायाम याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली.

मनस्वी अभियान
-
मानसिक आरोग्य तपासणी व समुपदेशन
-
नैराश्य, चिता, ताणतणाव, निद्रानाश, व्यसनाधीनता अशा लक्षणाबाबत वैद्यकीय सल्ला
-
औषधोपचार (आवश्यक असल्यास)
-
मानसिक आरोग्यावर माहितीपर मार्गदर्शन व जनजागृती
-
रूग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय किंवा मानसिक आरोग्य तज्ञांकडे संदर्भ
प्लास्टिक निर्मूलन अभियान
-
मोहिमे बाबत परिपत्रक काढून सर्व यंत्रणा व ग्रामपंचायत यांचा सहभाग घेतला.
-
सर्व खातेप्रमुखांची प्रत्येक तालुक्याला नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली.
-
जिल्ह्यातील सर्व गावांसोबत पत्र व बैठक व वृत्तपात्रांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली.
-
वृत्तपत्रांच्या माध्यमातून व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.
-
जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रक्रियेसाठी स्थानिक प्रक्रिया केंद्रांसोबत समन्वय करण्यात आला.
-
दि. ०२ मार्च २०२४ रोजी पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी सुरु असणाऱ्या या मोहिमेत सातत्य राखले गेले.
-
आज अखेर जिल्ह्यात २० टन पेक्षा जास्त प्लास्टिक संकलित करण्यात आले आहे व पुनर्वापरसाठी स्थानिक प्रक्रिया केंद्रांना देण्यात आले आहे.
-
जिल्ह्यात प्लास्टिक कचऱ्याबाबत जागृती करण्यात यश आले.
-
जमा होणारे प्लास्टिक वर्गीकृत नसणे.
-
प्लास्टिक माती मिश्रित व ओले असणे.
-
जमा झालेल्या प्लास्टिक वर प्रक्रिया करणेसाठी स्थानिक प्रक्रिया केंद्र धारकांची कमतरता.
-
प्लास्टिक वाहतुकीचा प्रश्न.
-
घरगुती स्तरावर स्वच्छ व सुका प्लास्टिक कचरा जमा करून तो ग्रामपंचायत मार्फत तालुकास्तरावर तयार होत असलेल्या प्लास्टिक कचरा निर्मुलन केंद्राकडे प्रक्रीयेसाठी पाठविण्यात येणार आहे.
-
मा. तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली व सागर मित्र, पुणेचे विनोद बोधनकर यांचे मार्गदर्शनाखाली घरगुतीस्तरावर शास्त्रोक्त पद्धतीने प्लास्टिक संकलन, वर्गीकरण करणे याचे गाव पातळीवर प्रशिक्षण देणेसाठी प्रत्येक तालुक्यातून तीन प्रवीण प्रशिक्षक तयार करण्यात आले.
-
या प्रशिक्षकाच्या माध्यमातून घरगुती स्तरावर शास्त्रोक्त पद्धतीने प्लास्टिक संकलन, वर्गीकरण कसे करायचे याबाबत प्रत्येक शाळेत, गावात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणारआहे.
पाण्याचा ताळेबंद

“दिव्यांग विदयार्थी जीवनसुरक्षा ठेव योजना’’ (दिविजा)


ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी

-
कृषी विभाग जिल्हा परिषद, सांगली मार्फत खरीप २०२४ मध्ये ड्रोन द्वारे नॅनो युरिया खत फवारणीची मोहीम राबवण्यात आली आहे.
-
युरियाचा वापर इतर खतांपेक्षा फार मोठ्या प्रमाणात होतो. प्रत्येक युरियाच्या ४५ किलो गोणीच्या भागे शासनास जवळपास १२००-१४४० रुपये अनुदान उत्पादक कंपनीस द्यावे लागते.
-
याशिवाय युरियामुळे निर्माण होणारे नायट्रेट प्रदूषण ही मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान असलेले नॅनो युरिया हे खत आत्मनिर्भर भारत वाटचालीत महत्वाचे पाऊल आहे.
-
नॅनो युरियाचा वापर कमी वेळात जास्त क्षेत्रावरती करण्यासाठी जिल्हा परिषद, सांगलीने काम करण्याचे ठरविले. त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून खरीप हंगामात ही मोहीम घेण्यात आली.
-
एक ड्रोन एका दिवसात २० एकर क्षेत्र फवारत असलेने झपाट्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यामुळे खरीप हंगामात १ लाख १० हजार नॅनो युरिया बॉटलचा वापर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला.
-
त्यामुळे ४९०० मेट्रिक टन युरीयासाठी कंपन्यांना द्यावी लागणारी शासनाची १३ कोटी ६५ लाख रुपये अनुदानाची रक्कम वाचली.
-
एका ड्रोनच्या साहाय्याने एका दिवसात २० एकर क्षेत्रावर फवारणी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
आतापर्यंत १,१०,००० पेक्षा अधिक बॉटल्स(Nano Urea) वितरित करण्यात आल्या.
मका उत्पादन वाढ अभियान

-
मका हे पिक आता केवळ खाद्य नाही, तर चारा, इथेनॉल, आणि औद्योगिक वापरासाठीचे ‘बहुगुणी पीक‘ ठरले आहे. मका उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग, बियाणे उत्पादक कंपन्या व शेतकरी यांनी १० एकर प्रात्यक्षिक प्लॉट्स तयार केले.
-
‘प्रगतवाण, क्रॉप जॉमेट्री व नॅनो युरिया, फेरोमोन सापळे, ड्रोनद्वारे फवारणी यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करू प्रत्येक एकरात 60 क्विंटल उत्पादनाचे लक्षांक ठेवण्यात आले होते. मका पिकही चार महिन्यांत एकरी लाखांपर्यंत पैसा मिळवून देऊ शकते! हे शेतकऱ्यांना पटवून दिले आहे.
-
या प्रयोगांनी ४५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रेरित केलं, तर अनेक शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनुभव कथनांद्वारे इतरांना
-
मार्गदर्शन करण्याचं वचन दिलं. हे तंत्रज्ञान शून्य अनुदानातून पोचवले गे केवळ माहिती, प्रशिक्षण आणि आत्मविश्वास याच्या जोरावर !
-
एका आता केवळ पर्यायी नाही, तर हुकमी पीक ठरतंय – कमी खर्च, कमी जोखीम, आणि भरघोस नफा याचा परिपाठ इथे सुरू झालाय !
इमारत प्रणाली
IMAARAT :
Integrated Measurement Assessment and Assurance system through eRecording for Administrative Transparency
कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने तसेच बांधकाम विभागाच्या विविध शाखेतील व उपविभागीय कार्यालयीन कामकाज एकत्रीकरण करणेसाठी सदर प्रणाली वापरता येणार आहे. यामुळे कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणता येईल. प्रस्तुत प्रकरणी आहे ते कामकाज सुलभ करणेसाठी संगणकीकृत होत आहे. हे करीत असताना जिल्हा परिषद लेखा संहिता १९६८ नुसारच सर्व अहवाल व नमुने तयार करणेत आलेले आहेत.
प्रायोगिक तत्वावर तासगाव उपविभाग कडून या प्रणाली नुसार कामकाज यशस्वीरीत्या पार पाडले असून, उर्वरित सर्व तालुक्यास लवकरच अंमलबजावणी करणेचे नियोजित करणेत आलेले आहे.

- प्रणालीचे दुहेरी वापरकर्ता प्रमाणीकरण (Two Step Verification) होणार असून यामुळे वापर कर्ता व्यक्तीची ओळख पटल्या खेरीज प्रणाली उघडणार नाही.
- प्रणाली SSL प्रमाणित असून संकेत स्थळ Hacking विरुध्द कवच स्थापित करते.
- या प्रणालीचा वापर करून पूर्ण कामकाज प्रक्रिया कागद विरहीत करता येते. यामुळे कागद वाचण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या पैशाची बचत देखील होणार आहे.
- ई- स्वाक्षरी चा वापर होणार असून एखाद्या महत्वाच्या नस्ती चे प्रमाणीकरण करण्यासाठी फिल्ड वर असताना देखील ते शक्य होणार आहे.
- जनरेट झालेले अहवाल, प्रमाणके, देयके, नसत्या इत्यादी सर्व बाबी ई – ऑफिस बरोबर सलग्न करता येणार आहेत.
- ह्या प्रणालीत बऱ्याच बाबी संगणकीकृत अंकगणित वापरून केले असल्याने प्रक्रिया सुलभ, जलद व निर्दोष होणार आहेत.
- वेळेची बचत होत असल्याने अभियंता यांना निरीक्षण च्या कामावर जास्त भर देता येणार आहे.
- कामाची गुणवत्ता आणि खर्चावर एका क्लिकवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
- सर्व अभिलेख डिजिटल स्वरुपात जतन होत असल्याने नस्ती गहाळ होणे, नसतीस वाळवी लागणे, पुरात भिजणे इत्यादी सर्व अडचणी धूर होणार आहेत.
- ही प्रणाली ई – गव्हर्नन्स च्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.
वैशिष्ट्ये: | फायदे: |
दुहेरी वापरकर्ता प्रमाणीकरण. | जलद व निर्दोष प्रक्रिया. |
SSL प्रमाणित संकेतस्थळ | विविध योजनांवर एकाचवेळी संनियंत्रण |
ई -ऑफिस संलग्नीकरण
|
कामाची गुणवत्ता आणि खर्चावर नियंत्रण व अवलोकन. |
ई – स्वाक्षरी | कामकाजाचे एकीकरण. |
बांधकाम उपविभाग तासगाव येथे प्रायोगिक अंमलबजावणी | अभिलेख डिजिटल स्वरुपात सुरक्षित.
|

"स्वयंपूर्णा पोर्टल"

-
एक स्वावलंबी परिसंस्था तयार करणे जिथे ग्रामीण महिला त्यांच्या उद्योजकीय उपक्रमांद्वारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतोल, बाजारपेठेत प्रवेशासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊ शकतील.
-
स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी एक कार्यक्षम आणि पारदर्शक ऑनलाइन बाजारपेठप्रदान करणे.
-
डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्सद्वारे उत्पादन दृश्यमानता आणि प्रवेश योग्यता वाढवणे.
-
योग्य किंमत, गुणवत्ता हमी आणि ग्राहकांचा विश्वास सुनिश्चित करून ग्रामीण महिलांना पाठिंबा देणे.
-
पारंपारिक आणि हस्तनिर्मित उत्पादनांमध्ये नावीन्य आणि मूल्यवर्धनास प्रोत्साहन देणे.
"दख्खन जत्रा"

-
ग्रामीण भागातील महिला व महिला शेतकरी उत्पादकांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे व उद्योजकीयदृष्ट्या सक्षमकरणे.
-
योग्य किंमत, गुणवत्ता हमी आणि ग्राहकांचा विश्वास सुनिश्चित करून ग्रामीण महिलांना पाठिंबा देणे.
-
पारंपारिक आणि हस्तनिर्मित उत्पादनांमध्ये नावीन्य आणि मूल्यवर्धनास प्रोत्साहन देणे.
-
विक्री यश: प्रदर्शनाच्या सात दिवसांत एकूण रु. ६१,३५,०००/- एवढ्या विक्रीची नोंद झाली.
-
स्टॉल्सची संख्या व विविधता: विविध तालुक्यांतील महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ, हस्तकला, सेंद्रिय उत्पादने, गृह सजावटीच्या वस्तू आदींच्या विक्रीसाठी स्टॉल्स लावण्यात आले.
-
पुरस्कार व सन्मान: १. उत्कृष्ट विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांना “बेस्ट सेल पुरस्कार” व प्रमाणपत्र. २. फळ सजावट व तृणधान्य स्पर्धा घेऊन विजेत्यांना व उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्राद्वारे सन्मानित केले.
-
सांस्कृतिक कार्यक्रम: सहभागी महिलांसाठी व नागरिकांसाठी दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
जटायू पोर्टल
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारानुसार, ज्या देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये तरूणांची लोकसंख्या जास्त असेल त्या देशाच्या प्रगतीचा दर सर्वाधिक असेल. या विचारानुसार आपली आजची तरूण पिढी हीच भारताचा भविष्यकाळ आहे, तथापि ही तरूणपिढी जीवन संघर्षातील ताणतणाव व वाईट संगतीमुळे अंमलीपदार्थांच्या सेवनाकडे वळत आहे. त्यामुळे फक्त त्या व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब, समाजाचे नुकसान होत आहे. या विकृतीपासून तरूणांना दूर ठेवण्यासाठी शासनस्तरावर विविध कार्यकमांची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये केंद्रशासनाच्या निर्देशानुसार, सन 2022 पासून राज्य व जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय अंमलीपदार्थ विरोधी समिती (NCORD) स्थापन झालेली असून ती सक्षमपणे कार्यरत आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव जिल्हा पोलीस अधिक्षक आहेत.
“अंमलीपदार्थमुक्त सांगली” हे ध्येय समोर ठेऊन सांगली जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून Antidrug Task Force ची स्थापना करण्यात आलेली आहे. सांगली जिल्हा 100 टक्के अंमलीपदार्थमुक्त होण्यासाठी या Task Force अंतर्गत सांगली जिल्हयातील विविध विभाग (पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय, औदयोगिक विकास महामंडळ,अन्न व औषध प्रशासन विभाग,जिल्हा आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग इ.) एकत्र येऊन त्यांच्या पातळीवर सक्रीय आहेत.
या सर्व विभागातून सांगली जिल्हा अंमलीपदार्थमुक्त होण्यासाठी केलेल्या कार्यामध्ये समन्वय साधावा व जिल्हयातील सर्व नागरिकांना एका दृष्टीक्षेपात सर्व माहिती उपलब्ध होण्यासाठी एका व्यासपीठाची निर्मिती करणे आवश्यक आहे, अशी संकल्पना तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांनी मांडली. या संकल्पनेतून जिल्हास्तरावर जटायू – JATAAYU (Joint Action on drug Trafficking And drug Abuse for Youth Upliftment) या नावाच्या पोर्टलची निर्मिती करणेत आलेली आहे. या पोर्टलच्या निर्मितीमध्ये वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सांगली यांनी महत्चाचे योगदान दिले आहे.
या पोर्टलवर सर्व विभागांनी केलेली कार्यवाही प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक विभागाला स्वंतत्र टॅबची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या पोर्टलवर सर्व नागरिकांना सांगली जिल्हा 100 टक्के अंमलीपदार्थमुक्त होण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा तपशील पाहता येईल. “अंमलीपदार्थमुक्त सांगली” हे ध्येय साकार करण्यासाठी आपणां सर्वांची साथ आवश्यक आहे. अंमली पदार्थ मुक्तीसाठी आपण सर्वांनी मिळून लढा दिला, तर नक्कीच एक दिवस आपला सांगली जिल्हा 100 टक्के अंमली पदार्थमुक्त होईल याचा आम्हास विश्वास आहे. अंमलीपदार्थांच्या विळख्यातून तरुणांना मुक्त करणे हे आव्हान आहे, परंतु अशक्य नक्कीच नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये सहभागी व्हावे.
बालविवाह प्रतिबंधक अभियान
मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत सांगली जिल्हा परिषद मध्ये मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सांगली जिल्हयातील माध्यमिक शाळांमध्ये मुलीसाठी बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे स्वरुप :–
- सांगली जिल्हयातील १० तालुक्यातील १० शाळा अशा एकूण 100 शाळा निवडण्यातआल्या.
- निवडलेल्या प्रत्येक शाळेत १२ ते १८ या वयोगटातील १०० विद्यार्थिनी असतील याची दक्षता घेण्यात आली.
- सांगली जिल्हयातील १०० शाळेतील प्रत्येकी १०० विद्यार्थिनी या प्रमाणे १०००० मुलीनी बालविवाह प्रतिबंधक लेखी शपथ घेण्याचे नियोजन होते.
- शपथेचा नमुना जिल्हा परिषद मार्फत देण्यात आलेला होता.
उदिदष्टे :-
- सांगली जिल्हयातील १२ ते १८ या वयोगटातील विद्यार्थिनींमध्ये बालविवाहाच्या दुष्परिणामाची जाणीव निर्माण करणे.
- बालविवाहाच्या विरुध्द विद्यार्थिनींच्या मनात ठाम निर्णयाची भावना निर्माण करणे.
फलश्रृती :-
- सांगली जिल्हयातील १०० शाळांचे एकूण १२६५९ विद्यार्थींनीनी बालविवाहाविरुध्द शपथ लेखन केले..
- बालविवाहाच्या दुष्परिणामा बाबत जिल्हायातील १०० शाळांमध्ये जनजागृती निर्माण झाली.
- यामुळे जिल्हयात भविष्यात होणा-या बालविवाहाला निश्चितपणे प्रतिबंधक होईल.


वरदान पोर्टल
VARDAAN
Rural Development through Aid and Assistance Network
(CSR Collaboration initiative)


वरदान (VARDAN – Visible Action for Development & Support) हे भारत सरकारचे CSR (Corporate Social Responsibility) संबंधित एक डिजिटल पोर्टल आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे CSR अंतर्गत देशभरात केल्या जाणाऱ्या प्रकल्पांची पारदर्शक नोंद ठेवणे, एकत्रित माहिती देणे, आणि समन्वय साधणे. संबंधित संगणक प्रणालीद्वारे कंपनींचा सामाजिक दायित्व पूर्ण करण्याच्या प्रयत्नांचे व्यवस्थापन करते. आपल्या दिलेल्या माहितीमध्ये आपल्याने या पोर्टलच्या अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश केलेला आहे.
-
CSR निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर सुनिश्चित करणे.
-
कंपन्या, NGO, सरकारी यंत्रणा आणि जनतेला CSR प्रकल्पांविषयी माहिती देणे.
-
CSR प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.
-
धोरणनिर्मात्यांना निर्णय घेण्यासाठी डेटा उपलब्ध करून देणे.
-
CSR निधी देणाऱ्या कंपन्या (Companies giving CSR funds)
-
CSR निधी प्राप्त करणाऱ्या संस्था (NGOs, Trusts, Societies etc.)
-
CSR प्रकल्प कार्यान्वित करणारे अंमलबजावणी संस्था
-
शासकीय यंत्रणा व मंत्रालये
-
CSR प्रकल्पांची संपूर्ण यादी (राज्यानुसार, जिल्ह्यानुसार, सेक्टरनुसार इत्यादी)
-
कंपन्यांनी कुठे किती CSR निधी खर्च केला आहे याची माहिती
-
प्रकल्पांची सुरुवात आणि समाप्तीची तारीख
-
निधीच्या वितरणाची माहिती
-
यशोगाथा आणि प्रभाव मूल्यांकन
-
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते
-
CSR निधी योग्य ठिकाणी पोहोचतो
-
कंपन्या आणि NGO यांच्यात समन्वय वाढतो
-
धोरण निर्मितीसाठी मदत होते