बंद

    येडेनिपाणी गावात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

    • प्रारंभ तारीख : 07/01/2026
    • शेवट तारीख : 07/01/2026
    • ठिकाण : YEDENIPANI

    येडेनिपाणी गावात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’अंतर्गत विकासाची नवी पहाट पाहायला मिळाली. गावाच्या प्रगतीत मानाचा तुरा रोवत सोलर पॅनेलचे (Solar Panels) दिमाखात उद्घाटन करण्यात आले. ☀️🌱
    ​या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते लोकप्रिय अभिनेते संदीप पाठक आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिवाली परब यांची उपस्थिती! त्यांच्या सहभागामुळे गावातील उत्साहाला उधाण आले होते.
    ​ठळक वैशिष्ट्ये:
    🥁 वाजत-गाजत जनजागृती फेरी: ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली.
    💡 शाश्वत ऊर्जा: सोलर पॅनेलच्या माध्यमातून गावाने सौर ऊर्जेचा स्वीकार करून पर्यावरणाभिमुख पाऊल उचलले आहे.
    🏆 आदर्श गाव: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात येडेनिपाणी गाव अतिशय कौतुकास्पद कामगिरी करत असून, इतर गावांसाठी एक आदर्श निर्माण करत आहे.

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.01.48 PM