विकसित भारत जी राम जी या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
विकसितभारत_जीरामजी: मिरज तालुक्यातून अभियानाचा शानदार शुभारंभ! 💐
आज सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील समडोळी येथे ‘विकसित भारत जी राम जी’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी माननीय विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत पुलकुंडवार साहेब, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे साहेब आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री. शशिकांत शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आयोजित विशेष ग्रामसभेत मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या या नवीन योजनेच्या माध्यमातून गावागावांत विकासाची नवी गंगा पोहचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. समडोळी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या अभियानाची सुरुवात यशस्वी झाली आहे.
बदलता महाराष्ट्र, विकसित भारत!

