एकात्मिक बाल विकास योजना
परिचय
एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्ष सांगली जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना संबंधित विविध कार्यक्रम, व योजना राबविण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेमार्फत 13 प्रकल्पाकडून ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार योजना राबविल्या जातात.
दृष्टीकोन आणि उद्दीष्टे
ग्रामीण भागातील 0 ते 6 वयोगटातील बालके, गरोदर स्त्रीया, स्तंनदा माता यांना शासनाच्या संदर्भ सेवा पुर विणे. तसेच 3 ते 6 वयोगटातील बालकांना पुर्व प्राथमिक शिक्षण देणे, माता व बाल मृत्य दर कमी करणे, पुरक पोषण आहार देणे. अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील मुलांचे कुपोषण कमी करणे, बालकांचा सर्वागींण विकास घडवून आणने,अंगणवाडी इमारत बांधकाम करणे.
उद्दीष्टे आणि कार्ये
एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद सांगली विभागामार्फत सांगली जिल्हयातील ग्रामीण भागात मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या मार्फत सुरु करणेत आलेली ” लेक लाडकी योजना ” राज्य शासनामार्फत सुरु करणेत आली आहे. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवासमाप्ती नंतर एक रकमी एलआयसी लाभ दिला जातो. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मार्फत ग्रामीण भागातील 3 ते 6 वयोगटातील मुलांना लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पोषण शिक्षण, सेवा दिल्या जातात. नवीन अंगणवाडीसाठी इमारत बोधणे व दुरुस्ती करीता डी.पी.सी.नाबार्ड मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो, एकात्मिक बाल विकास विभागामार्फत भरती प्रकिया व बदली प्रकिया राबवली