ग्रामपंचायत विभाग
परिचय
ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेचा एक महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर नियंत्रण ठेवतो. या विभागाच्या माध्यमातून शासनाच्या योजना ग्रामपंचायतींमध्ये राबवल्या जातात.
ग्रामपंचायत विभागाची कामे:
- ग्रामपंचायतींचे संपूर्ण नियंत्रण ठेवणे.
- ग्रामपंचायतीं मध्ये शासनाच्या योजना राबवणे सरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मानधन वितरीत करणे जमीन महसूल अनुदान, मुद्रांक शुल्क अनुदान यांचे वितरण आणि हिशेब ठेवणे.
- निर्मल भारत अभियान ही योजना राबवणे.
- विस्तार अधिकारी (पं), विस्तार अधिकारी (सां.), ग्रामविकास अधिकारी यांची व्यवस्थापन करणे,ग्रामसेवक संवर्गाची आस्थापना सांभाळणे.
ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख:
- ग्रामपंचायत विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 अधिकारी असतो. त्यांचे पद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) असते.
- त्यांना मदत करण्यासाठी वर्ग-२ चे सहाय्यक गटविकास अधिकारी असतात.
ग्राम पंचायत विभाग
जिल्हा परिषद,सांगली सदर विभाग हा ग्रामसेवक संवर्गाची जिल्हास्तरीय आस्थापना आहे.या विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायातींवर नियंत्रण ठेवण्यात येते. या विभागामार्फत शासनाच्या विविध योजना पंचायत विभागाशी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. त्याबाबत नियंत्रण व आढावा घेतला जातो.
दृष्टीकोन आणि उद्दीष्टे
ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, विविध प्रकारच्या घरकुल योजने अंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
उद्दीष्टे आणि कार्ये
- ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवणे.
- ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणे.
- शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतींमार्फत राबवणे.
- ग्रामपंचायतींवर नियंत्रण ठेवणे.
- सरपंच,सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन वितरीत करणे.
ग्रामपंचायत विभागाची कार्ये
- गावात रस्ते बांधणे.
- गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
- दिवाबत्तीची सोय करणे.
- जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
- सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
- सांडपाण्याची व्यवस्था करणे.
- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
- शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
- ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
- गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
- लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.