बंद

    पशुसंवर्धन विभाग

    विभागाविषयी माहिती

    व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा व कौटुंबिक एकनिष्ठता निर्माण करून ग्रामीण अर्थचक्राला गतिमान करणारा व्यवसाय म्हणजे पशुसंवर्धनाचा व्यवसाय होय. महाराष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर ठेवण्यात इथल्या पशुधनाचा वाटा मोठा राहिला आहे. या पशुधनाच्या संगोपन, संवर्धन आणि विकासाची जबाबदारी सांभाळत प्रगत व उन्नत महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देण्यात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागही नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांमुळे आज ग्रामीण भागात विकास आणि प्रगतीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. पशुसंवर्धनविषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीतून ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र आणखी गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विविध उपक्रम व योजनांच्या माध्यमातून कार्यरत व कटीबद्ध राहिला आहे. पशुसंवर्धनविषयक जास्तीत जास्त उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हे महत्वपूर्ण कामकाज विभागामार्फत करणेत येत आहे. सांगली जिल्हयात पशुधनांची संख्या 50,80,390/- (उदा.गुरे, मेंढया,शेळया, कोंबडया इ.) इतकी आहे. तसेच सांगली जिल्हयात राज्यस्तरीय व स्थानिकस्तर असे मिळून श्रेणी-1 व श्रेणी-2 152 इतके दवाखाने उपलब्ध असून पशुपालकांना सेवा व सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी श्रेणी-1 पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक व परिचर ही पदे कार्यरत आहेत.

    परिचय

    सांगली जिल्हयात सन 2019 च्या पशुगणनेनुसार जिल्हयात पशुधनांची एकूण संख्या 50,80,390/- (उदा.गुरे, मेंढया,शेळया, कोंबडया इ.) इतकी आहे. तसेच सांगली जिल्हयात राज्यस्तरीय व स्थानिकस्तर असे मिळून श्रेणी-1 व श्रेणी-2 152 इतके दवाखाने उपलब्ध असून पशुपालकांना सेवा व सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी श्रेणी-1 पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक व परिचर ही पदे कार्यरत आहेत.

    दृष्टीकोन व उद्दिष्टे

    पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागात विकास आणि प्रगती होऊन पशुपालकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्याद्वारे रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी पशुपालकांना त्यांच्या पशुधनास आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा. वंधत्व निवारण उपाय योजनेद्वारे जनावरांचे प्रजनन दर वाढून त्याद्वारे विविध उत्पादन क्षमता वाढविणे.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    पशुपालकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्याद्वारे रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी प्रयत्न करणे त्यासाठी पशुपालकांना त्यांच्या पशुधनास आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा पुरविणे. वंधत्व निवारण उपाय योजनेद्वारे जनावरांचे प्रजनन दर वाढून त्याद्वारे विविध उत्पादन क्षमता वाढविणे. कृत्रिम रेतनाच्या सुविधा आणि पशुआरोग्यासाठीच्या सोयी सुविधा या दोन महत्त्वाच्या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रामीण शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुट पक्षी वाटप करुन पुरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे. पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करुन जास्त दुध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढविणे. पशुधनास लागणाऱ्या वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढविणे.