बंद

    लघुपाटबंधारे विभाग

    विभागाविषयी माहिती

    महाराष्ट्रामध्ये सन 1962 पासुन जिल्हा परिषदांची निर्मिती झाली आहे. त्यामध्ये कार्यकारी अभियंता (इ.व.द)/ लघु पाटबंधारे हे विभाग निर्माण करण्यात आले. लघु पाटबंधारे अधिक्षेत्रात पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे, वळण बंधारे, सिमेंट बंधारे व त्यांची दुरूस्ती यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे विनियोग करुन कामे केली जातात.

    परिचय

    महाराष्ट्र राज्य पंचायत समिती जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार 0 ते 100 हेक्टर क्षमतेपर्यतचे बांधकाम देखभाल दुरूस्ती जिल्हा नियोजन समिती अनुदानातुन केली जाते.

    सांगली जिल्हा परिषद लघु पाटबंधारे अखत्यारीत एकूण ८ उपविभाग आहेत ते खालीलप्रमाणे:

    1. शिराळा
    2. वाळवा
    3. मिरज
    4. जत
    5. आटपाडी
    6. खानापुर
    7. तासगांव
    8. कवठेमहांकाळ

    दृष्टीकोन व उद्दिष्टे

    सांगली जिल्ह्यातील ग्रामिण भागातील शेतजमीनीस अप्रत्यक्ष सिंचन प्राप्त करुन देणे व जमिनीतील पाण्याचे पातळीत वाढ करणे. जिल्हा नियोजन समिती कडुन प्राप्त झालेल्या निधीमधुन दोन वित्तीय वर्षात मुदतीत पुर्ण करुन निधीचा योग्य विनीयोग करणेची दक्षता घेतली जाते. तसेच जिल्हा परिषदेकडील 0 ते 100 हेक्टर बारमाही पाणी असलेले तलाव मत्स्य सवंर्धनासाठी दिले जातात.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    जिल्हा परिषद (ल.पा.) कडे खाली नमुद केलेले योजनांवर प्रतिवर्षी अनुदान प्राप्त होते:

    1. जिल्हा नियोजन समिती (सर्वसाधारण) – 0 ते 100 हेक्टर क्षमतेपर्यंतचे ल.पा. योजना बांधकाम व दुरूस्ती (2702-5429) यामध्ये नविन पाझर तलाव, गाव तलाव, व चेक डॅम (सिमेंट बंधारे) तसेच अस्तित्वातील तलाव/ बंधारे यांची दुरूस्ती करणे.
    2. जिल्हा नियोजन समिती (सर्वसाधारण) – 0 ते 100 हेक्टर क्षमतेपर्यंतचे को.प. बंधारे बांधकाम व दुरूस्ती (2702-5438) यामध्ये नविन गेटेड बंधारे तसेच आस्तित्वातील गेटेड/ कोल्हापुर पध्दतीचे बंधारे दुरूस्ती करणे.
    3. जलयुक्त शिवार अभियान 2.0 – 0 ते 100 हेक्टर क्षमतेपर्यंतचे नविन बंधारा बांधणे/ बंधारे बांधकाम व अस्तित्वातील योजनेंची दुरूस्ती.
    4. जिल्हा परिषद स्वीय निधी – 0 ते 100 हेक्टर क्षमतेपर्यंतचे अस्तित्वातील योजना दुरूस्ती.
    5. अटल भुजल योजना – 0 ते 100 हेक्टर क्षमतेपर्यंतचे नविन बंधारा बांधणे/ बंधारे बांधकाम व अस्तित्वातील योजनेंची दुरूस्ती.