बंद

    शिक्षण विभाग (प्राथमिक)

    विभागाविषयी माहिती

    प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली हा विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता-1 ली ते 8 वी च्या सर्व शाळा तसेच खाजगी प्राथमिक इयत्ता-1 ली ते 8 वी स्वयंअर्थसहाय्यित एकूण-2,120 शाळा व त्यामध्ये एकूण-1,96,006 इतके विद्यार्थी व त्यांना शिकवण्यासाठी एकूण-7,779 शिक्षक आहेत. या सर्व शाळांवर शिक्षण विभाग संनियंत्रण करते. शाळांना मान्यता देणे, शाळांमध्यसे गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविणे, इ. कामकाज या कार्यालयामार्फत चालते. तसेच, या शाळांतील विद्यार्थ्यांना विविध योजनेचे लाभ दिले जातात. त्यामध्ये केंद्र शासनाअंतर्गत शालेय पोषण आहार (मध्यांन्‍ह भोजन), समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके दिली जातात. जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षिय यंत्रणेमार्फत या योजना सर्व विद्यार्थ्यांना मिळतात. तसेच, विविध शिष्यवृत्त्यांचा लाभ मिळत आहे, शैक्षणिक कामकाज व्यवस्थित सुरु आहे, अर्थिक विनियोग व्यवस्थित सुरु आहे,  यांचे संनिंयत्रण पर्यवेक्षिय यंत्रणेमार्फत केले जाते.

    परिचय

    सांगली जिल्हा परिषद अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून भौतिक सुविधा बरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. सन-2023-2024 मध्ये शिष्यवृत्तीचे जिल्हा परिषद शाळेचे इयत्ता-5 वी चे 159 विद्यार्थी व इयत्ता-8 वी चे 20 विद्यार्थी आहेत. NMMS चे इयत्ता-8 वी चे जिल्हा परिषद शाळेचे एकट्या तासगाव तालुक्यातील एकूण-65 विद्यार्थी आहेत. नवोदयसाठी इयत्ता-5 वी साठी जिल्हा परिषद शाळेचे  46 विद्यार्थी आहेत.

    दृष्टिकोन व उद्दिष्टे

    ग्रामीण भागातील (वाडी वस्तीवरील शाळांसह) तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची व्यवस्था करणे. शाळांना भौतिक सुविधा करणे दर्जेदार देणे. राष्ट्रीय अभ्यासक्रम राबविणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.

    उद्दिष्ट व कार्ये

    सर्व समावेशक आणि समान शिक्षणानुसार सर्व मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे. शैक्षणिक प्रणालीचे आधुनिकीकरणानुसार डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, विविध कौशल्य विकसित करणे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. कला,संस्कृती आणि परंपरा यांचा परिचय करुन देणे. सरकार-शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यात पारदर्शकता आणणे यानुसार कार्यवाही सुरु आहे.