शिक्षण विभाग (माध्यमिक)
विभागाविषयी माहिती
माध्यमिक शाळा संहिता व त्यामध्ये वेळोवेळी झालेली सुधारणा यामधील तरतूदीनुसार तसेच शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय परिपत्रकानुसार माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज करण्यात येते.
शिक्षण विभाग (माध्यमिक) कडून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ देणे तसेच नवीन माध्यमिक शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव शिफारशीसह शासनास सादर करणे, अनुदानित शाळांना वेतन/वेतनेतर, इमारत भाडे व इतर अनुषंगिक अनुदाने वितरित केली जातात.
व्हिजन:
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे व ती टिकवणे होय. योजनांचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून शैक्षणिक विकास साधण्याचा विभागाचा सदैव प्रयत्न असतो.
या विभागामार्फत सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षकांची जबाबदारी पार पाडली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन इत्यादींचा समावेश आहे.
मिशन:
शिक्षण विभाग (माध्यमिक) कडून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ देणे तसेच नवीन माध्यमिक शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव शिफारशीसह शासनास सादर करणे, अनुदानित शाळांना वेतन/वेतनेतर, इमारत भाडे व इतर अनुषंगिक अनुदाने वितरित करणे हे प्रमुख कार्य आहे.
उद्दिष्टे व कार्य:
- नवीन माध्यमिक शाळांच्या परवानगीसाठी शिफारस करणे.
- विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे मूल्यमापन करणे.
- शासन नियमानुसार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना मान्यता देणे.
- शाळेची पट पडताळणी करणे.
- वेतनेतर अनुदानाची तपासणी करणे.
- इ. 10 वी व इ. 12 वी च्या परीक्षेबाबत कामकाज करणे.
- माध्यमिक शाळांची तपासणी करणे.
- खाजगी शाळांच्या सेवानिवृत्तीच्या प्रकरणांवर कामकाज करणे.
- माध्यमिक शाळांची संच मान्यता विषयक कामकाज करणे.
- विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, जात इ. बाबत बदल करणे.