कृषी विभाग
कृषि विभाग मार्फत सन-2025-26 मध्ये शेतक-यासाठीच्या योजना
अ.क्र | योजना बाब | देय अनुदान मर्यादा | लाभार्थी निवड निकष |
1 | चाफकटर पुरविणे 2 एचपी इलेक्ट्रीक मोटरसह
|
किमतीच्या 50% किंवा कमाल 10000/- पैकी कमी असेल ती रक्कम | 1.यापुर्वी जि.प.च्या चाफकटर (कडबाकुट्टी)/पी.व्ही.सी. /एच.डी.पी. पाईप/ड्रोन या वैयक्तिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
2.स्वत:चे नावे 7/12 व खाते उतारा असावा. 3.अनु.जाती/जमाती, महिला लाभार्थी व अल्प, अत्यल्प भूधारक शेतक-यांना प्राधान्य राहील. 4.दिव्यांग व्यक्तीना प्राधान्य देण्यात येईल. 5.चाफकटर (कडबाकुट्टी) मशिन करीता अर्जदार शेतक-यांकडे पशुधन असलेबाबत पशुवैघकीय यंत्रणेचा दाखला.
|
2 | पी.व्ही.सी./एच.डी.पी. पाईप पुरवठा करणे | पी.व्ही.सी. पाईप किमतीच्या 50 टक्के रु.35/- प्रती मीटर मर्यादेत, एच.डी.पी.ई. पाईप किमतीच्या 50 टक्के रु. 50/- प्रती मीटर मर्यादेत, एका शेतक-याला जास्तीत जास्त 10000 मर्यादेतच अनुदान देय राहील. | |
3 | सेंद्रीय शेती विकासासाठी प्रकल्प राबविणे व आवश्यक निविष्ठा व यंत्र सामुग्री पुरविणे | किमतीच्या 50% किंवा कमाल 10000/- पैकी कमी असेल ती रक्कम | |
4 | शेतीसाठी ड्रोन वापर प्रोत्साहन देणेसाठी प्रशिक्षण व अनुदानावर ड्रोन पुरवठा योजना | शेतकरी प्रशिक्षणासाठी र.रु 10000 प्रती शेतकरी व ड्रोन खरेदीसाठी र.रु 100000 प्रती शेतकरी | |
5 | कृषि क्षेत्रात AI वापरासाठी कृषि प्रोत्साहन योजना | किमतीच्या 50% किंवा कमाल 10000/- पैकी कमी असेल ती रक्कम |
- योजनेसाठी अर्जाचा नमुना गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध असून तालुकास्तरावरच मागणी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण करुन पं.स. कडे सादर करावा.
- लाभ घेऊ इच्छिणा-या लाभार्थीने ज्या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या घटकाचा जिल्हा परिषदेच्या अन्य योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी निवड सर्व प्राप्त अर्ज संकलित केलेनंतर लॉटरी पध्दतीने करणेत येईल.
- मंजूर लाभार्थीने पूर्व संमतीनंतर वरील वस्तूंची खरेदी कॅशलेस पध्दतीने खुल्या बाजारपेठेतून करावयाची असून अनुदानाची रक्कम ऑनलाईन पध्दतीने त्यांचे बँक खातेवर वर्ग करणेत येईल.
- विहीत मानकांची तसेच शासकीय /मान्यता प्राप्त संस्थेचा तपासणी अहवाल असणारी वस्तू/ औजारे खरेदी करणे बंधनकारक राहील. अन्यथा अनुदानास अपात्र ठरविणेत येईल.
6.गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे 27/06/2025 अखेर प्राप्त अर्जाचा विचार केला जाईल.या तारखेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत
- कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये लाभार्थीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अ.जाती, अ.जमाती, दिव्यांग व महिला शेतक-यांना प्राध्यान देण्यात येईल.
लाभार्थी:
वरीलप्रमाणे
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा